दोन दिवसापूर्वी यवतमाळ शहरालगतच्या भोयर बायपास वर एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली होती. यातील मृत जवळा तालुका आर्णी येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. गजानन मारुती राठोड वय वर्ष 44 असे मृताचे नाव आहे 31 ऑगस्टला भोयर बायपास वर एका इसमाचा मृतदेह आढळला होता. धाबा चालकाला प्रथम तो दिसून आला त्याने अवधूतवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी घाटून पंचनामा केला मात्र मृताची ओळख पटू शकली नव्हती त्याचा दगडाने ठेचून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी केला होता. तेव्हापासून पोलीस मृताची ओळख पटवण्यासाठी धडपडत होते. अकेरीस शुक्रवारी त्यांच्या हातावर गोंदून होते. त्यामुळे त्यांची ओळख पटली. गजानन यांचा मुलगा जयसिंग याने आर्णी पोलीस ठाण्यात वडील 30 ऑगस्ट च्या रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. 30 ऑगस्टला गजानन घरून निघून गेला कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात शोध घेतला मात्र तो कुठेही आढळून आला नाही. यवतमाळ पोलिस खुनाचा तपास करीत आहे
अखेर त्या मृताची ओळख पटली
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा