आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून जवळा समाजमंदिर येथील दोन्हीही महामानवांच्या डॉ .बाबासाहेब आबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण आणि पुष्प अर्पण करून साजरा करण्यात आला. यावेळी जवळा गावातील नागरिक तथा वंचित बहुजन आघाडी आर्णी तालुका प्रमुख श्री ज्ञानदिप चोपडे जवळा तसेच श्री रामटेके सर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सेवानिवृत्त शिक्षक श्री गुरुदेव विद्या मंदिर,कनिष्ठ महाविद्यालय जवळा. सरांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर उजाळा देत ग्रामवासीयांना माहिती दिली. त्यांनतर ज्ञानदीप भाऊ चोपडे यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आकाश आडे यांनी केले.
जवळा येथे शिक्षक दिन साजरा
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा