गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरूणाचा नदीत बडून मृत्यू

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरूणाचा नदीत बडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना घडली आहे. दिग्रस तालुक्यातील महागाव येथील घटना आहे. सोपान बबन गावंडे (वय-16) रा. महागाव व गोकुळ दत्ता टेटर (वय-16) रा.महागाव असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार 9 सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरगुती गणपती विसर्जनासाठी तरूणांसोबत नदिवर गेले होते. यावेळी सोपान व गोकुळ देखील पाण्यात उतरले. गणपती विसर्जन झाल्यानंतर काही वेळाने गणपती बुडाला की नाही पाहण्यासाठी पुन्हा पाण्यामध्ये गेले होते. दरम्यान, त्याला पाण्याचा अंदाज न असल्याने वाहत्या पाण्यात पाय घसरून पडला.
यावेळी उपस्थित तरूणांनी आरडा ओरड केली परंतू तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यांना पाण्याच्या बाहेर काढून तातडीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबतची पोलीसांना माहिती होताच पोलीस घटना स्थळ गाटून पंचनामा करून पुढील तपास महागाव बीडचे जमादार मुकुंद केंद्रे करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...