आर्णी तालुक्यात गणपती विसर्जन शांततेत पोलीसांचा चोख बंदोबस्त

जवळा (ता.प्र.) दहा दिवस मगंलमय वातावरणात विराजमान असलेले गणपती बाप्पाला आर्णी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढुन शुक्रवार पासुन गणपती विसर्जनाला सुरूवात होऊन गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मिरवणुकीत गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या असे म्हणत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आग्रहाचे आमंत्रण देत होते.
आर्णी शहरातील 28, ग्रामीण भागातील 130,व 18 गावात एक गाव एक गणपती ची गणेशोत्सव मंडळाने नोंदणी करून परवानगी घेतली होती. गणपती उत्सव दरम्यान व गणपती विसर्जनाच्या दिवशी शहर व ग्रामीण भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार पितांबर जाधव यांनी उत्कृष्ट नियोजन करून चोख बंदोबस्त ठेवला होता.आर्णी शहरात शुक्रवार ला दुपार पासुन गणपती विसर्जनाला सुरूवात झाली. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल-ताशा, बॅन्ड पथक, भजनी मंडळ, महीलाचे भजनी मंडळ, वारकरी भजनी मंडळ, डफडी वाद्य आदी मिरवणुकीत होते
गणपती विसर्जनाच्या दिवशी शहर व ग्रामीण भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार पितांबर जाधव यांनी 5 पोलीस अधिकारी, 15 स्पेशल पोलीस अधिकारी, 40 पोलीस कर्मचारी, 38 होमगार्ड तैनात ठेवले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...