आसरा येथे युवकांची आत्महत्या

आर्णी (ता.प्र.) गणेश एकंडवार आर्णी तालुक्यातील आसरा येथे युवकाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सत्यजित रामदास मडावी वय ३५ राहणार आसरा असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे.
या बाबतची फिर्यादी संतोष सोमा मडावी यांनी आर्णी पोलीस स्टेशनला दिली. फिर्यादी वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत काळुसे, जमादार देवानंद मुनेश्वर, पोलीस शिपाई मिथुन जाधव यांनी पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली.
सत्यजित मडावी याने आत्महत्या कशामुळे केली यांचे कारण समजु शकले नाही. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...