निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा

निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा # आर्णी तालुक्यातील चिंचबर्डी येथील प्रकार # ग्रा.पं.सदस्यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
जवळा:- आर्णी तालुक्यातील गट ग्रामपंचायत बारभाई अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्र.०२ चिंचबर्डी येथे पंधराव्या वित्त आयोगातून सुरु असलेल्या विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.सविस्तर वृत्त असे की,आर्णी तालुक्यातील मौजा चिंचबर्डी येथे अंगणवाडी दुरुस्ती,पाणीपुरवठ्याची वाढीव पाईप
लाईन,नाल्यावरील रपटे इत्यादी विकासकामे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येत आहे.पण हे सर्व कामे निकृष्ट दर्जाची,इस्टीमेट नुसार कोणत्याही बाबीची पूर्तता न करता,थातूर- मातुर पद्धतीने करून शासकीय मलिदा लाटण्याचे काम कंत्राटदार करित असल्याची तक्रार दिनांक ८ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत बरभाई येथील ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी यांना दिली.
व संबंधित कामाची सखोल चौकशी करुंन दोषीवर कारवाई करून,या कामाच्या अदा करण्यात आलेल्या देयकाची वसुली करण्यात यावी अशी मागणी या ग्रामपंचयात सदस्यांनी केली आहे.यावेळी उपस्थित आकाश राठोड,शंकर पवार,सपना राठोड,जया जाधव हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...