गावकऱ्यांन कडुन युध्द स्तरावर शोध सुरू
फुलसावंगी येथील खोलेश्वर मंदिरासमोरील सिंचन विभागाच्या बंधाऱ्या वरुन पाय घसरून पडल्याने पुराच्या पाण्यात वाहुन गेला.
परतीच्या पावसाने रात्री पासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्याना पूर आले असून या पुरात येथील वॉर्ड क्रमांक 3 मधील इसम वाहून गेल्याची घटना घडली आहे.
राञभराच्या मुसळधार पावसा मुळे नदी नाल्याना पूर आले आहे.ह्या पुराच्या पाण्यातुन बकऱ्या चा चारा आणण्यासाठी गेलेले शेत मजूर वाघु शेषराव रणमले (अं.वय ४०) हा इसम सिंचन विभागाच्या बंधाऱ्या जवळू वाहून गेला.प्रथम दर्शनी नागरिकांनी आरडाओरडा केला. व नागरिकांनी सदर इसमाला शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले वृत्त लिहे पर्यंत सदर इसमाचा शोध लागला नव्हता महागाव तहसील प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली आहे.वाघु रणमले यांना पत्नी ,एक मुलगा एक मुलगी असा अप्त परिवार>आहे.
नाल्यात पाय घसरून तरुण वाहुन गेला
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा