काम न करताच १३ लाख रुपये काढल्याचा ग्रामस्थांचा आरोप
समस्येसाठी ग्रामस्थांनी सरपंच सचिव यांना धरले धारेवर
जवळा:- आर्णी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत देवगाव येथे दिनांक १४ सप्टेंबर रोजी "ग्रामसभा" आयोजित करण्यात आली होती.सकाळी ११ वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली.सुरुवातीला महात्मा गांधी तंटामुक्ती समिती च्या कार्यकारणीची निवड करण्यात आली.त्यानंतर ग्रामसभेच्या अध्यक्षा सरपंचा कुसुम गोदमले यांनी ग्रामसभेला प्रश्न विचारण्यास सांगितले.लोकांनी प्रश्नाचा वर्षाव केला,मात्र ग्रामसभेच्या अध्यक्ष्याकडून ग्रामसभेला समाधानकारक उत्तर मिळाले नाही.त्यामुळे नागरिक संतापले,व ग्रामसभेमध्ये गोंधळ सुरु झाला.राजेश शंकर जाधव या युवकाने,"सिमेंट नाला बांध" हे काम न करताच १३ लाख रुपये काढल्याचा प्रश्न ग्रामसभेमध्ये मांडला.मग ग्रामसभेमध्ये अध्यक्ष,सचिव व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु झाली.व तणावाचे वातावारण निर्माण झाले.पण वेळीच जवळा बिटचे जमादार संजय भारती हे घटनास्थळी दाखल झाले,नागरिकांना शांत केले. व होणारा अनर्थ टळला.
ग्रामपंचायत देवगाव येथे २०२२ या आर्थिक वर्षात उपजलसिंचन विभाग दारव्हा अंतर्गत सिमेंट नाला बांध हे तीन काम मंजूर आहे.काम कागदोपत्री दाखवून,
हे काम न करताच या तिन्ही कामाचे अकुशल.मजुराच्या नावे काम दाखवून १२ लाख रुपये काढण्यात आले.या कामाची चौकशी करून अदा केलेली रक्कम वसुल करावी.
राजेश शंकर जाधव,ग्रामस्थ देवगाव
ग्रामसभेने आरोप केलेल्या कामाची चौकशी करून १५ दिवसाच्या आत केलेल्या चौकशी चा अहवाल ग्रामसभे समोर ठेवला जाईल.
मंगल अंबुरे,ग्रामसेवक देवगाव
ग्रामसभा ही ग्रामपंचायत ने केलेल्या कारभारा चा हिशोब घेण्यासाठी,गावकर्यांची समस्या मांडण्यासाठी घेतलेली सभा असते,पण ग्रामसभेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची समाधान कारक उत्तरे च ग्रामसभेला मिळाली नाही.आता न्याय मागावा तरी कुणाला असा प्रश्न ग्रामस्थांनी केला.
देवगाव येथे ग्रामसभे मध्ये राडा
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा