दाडीचे पैसे देण्याच्या शिल्लक कारणावरून दोघांचा खून

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामध्ये बोधडी(बु) येथे एका सलूनमध्ये दाढीचे पैसे देण्याच्या कारणावरून दुकानदाराने ग्राहकाची धारदार शस्त्राने हत्या केली त्यानंतर या प्रकारचा वचपा काढण्यासाठी अज्ञात जमावाने सलून दुकानदाराची ठेचून हत्या केली. या दुहेरी खुणाची खळबळजनक घटना बोधडी येथे गुरुवारी 14 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी घडली हत्याकांडाच्या घटनेनंतर सलून दुकान 2 घंराची जायपोळ झाल्याची माहिती असून, तणावाच्या पार्श्वभूमीवर बोधडीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
बोधडी येथील अनिल मारुती शिंदे वय(40)यांचे बोधडी बाजारपेठेत सलून चे दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या दुकानात बोधडी येथीलच व्यंकटी सुरेश देवकर वय( 22) दाढी करण्यासाठी आला होता. दाढी करत असताना अर्धी दाढी झाल्यानंतर अनिल शिंदे यांनी व्यंकटी देवकर ला दाडीचे पैसे मागितले याच कारणावरून दोघांत वाद झाला. वादातच अनिल शिंदे यांनी व्यंकटी देवकर यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. ही घटना गावात पसरतात सलून दुकाना जवळ मोठा जमाव जमला व्यंकटी यांच्या खुनाचा वचपा काढण्यासाठी गावातील अध्यात जमावाने अनिल शिंदे याला मारहाण केली. या मारहांनीत गंभीर जखमी होऊन मरण पावला हत्याकांड्यानंतर दोन्ही बाजूच्या जमावाने जाळपोळ केली.
यात 2 ते 3 दुकाने व 2 घरे जळ्याल्याचे सांगण्यात आले. अग्निशामक दलाचा बंब वेळेवर पोहोचल्याने भला मोठा अनर्थ टळला. बोधडीतील दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे फौजफाट्यासह बोधडीला रवाना झाले. स्फोटक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी किनवट सह मांडवी, सिंदखेड, इस्लामपूर येथील पोलीस कुमकासह नांदेडचे जलद कृती दल व अन्य पथक तैनात झाल्याने बोधडी गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले. रात्री उशिरापर्यंत दुहेरी हत्याकांडप्रकरणी गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...