घरकुलापासून वंचित असणाऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आर्णी तालुका यांनी गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन

आर्णी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी च्या सर्व कार्यकर्त्यांनी दि.१५/९/२०२२ रोजी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले त्या निवेदनात असंख्य योजनेपासून वंचित असणाऱ्यांना अद्याप कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. चार वर्षापासून पाच अर्ज ग्रामपंचायत च्या मागणीनुसार सादर केले मात्र अद्यापही घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला नाही
ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे नव्याने सादर केलेल्या अर्जासंदर्भात विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तर देत असल्याचे समजले. गरजेची शहानिशा न करता धनाने बलाढ्य पक्के घरे असणाऱ्याना घरकुल मंजूर होत आहे. मात्र पात्र गरजू लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवल्या जात आहे.
गरजूंना वादळ वारा पावसाचा सपाटा व उन्हाचा तडाका सोसावा लागत आहे. तरी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन गटविकास अधिकारी यांना दिले. या वेळी वंचित बहुजन घाडीचे *तालुकाध्यक्ष* ज्ञानदीप चोपडे, *कार्याध्यक्ष* प्रक्षीक मुशेश्वर, महादेव लंबे, गजानन मूजमुले,विजय राठोड, भारत गायकवाड, सयाजी गवळी, इत्यादी उपस्थित होते..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...