वनविभागाच्या वतीने सदाशिव अनंत भागवत विद्यालयात चित्ता बचाव कार्यक्रम

आर्णी (ता.प्र.)चित्ता बचाव कार्यक्रम अतंर्गत वनविभागाच्या वतीने तालुक्यातील म्हसोला कान्होबा येथील सदाशिव अनंत भागवत विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य संजय दुधाट तर प्रमुख पाहुणे म्हणून वनरक्षक एस. आर. ताजणे, श्रीमती काळे, मोहगे हे होते.
यावेळी रेंजर मोहगे यांचे मार्गदर्शन झाले. त्यांनी सांगितले की चित्ता भारतातुन नामशेष झाला. तो परत आणुन अन्नसाखळी पुर्ण करणे हे प्रमुख उद्दिष्टे ठेवून दक्षिण आफ्रिका या देशातून भारतात आणले जात आहे. कान्हा नॅशनल पार्क मध्ये येथे त्यांना ठेवणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बन्सोड यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...