माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची लोणी येथील शेतशिवार भेट--
आर्णी (ता.प्र.) एक दिवस माझ्या बळीराजा साठी या अभियाना अंतर्गत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांनी तालुक्यातील लोणी येथे शेतशिवार भेट देऊन तेथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके,उपसरपंच अमोल वारंगे, पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी पल्लवी देशमुख, मंडळ अधिकारी ठाकरे, कृषी सहाय्यक गजानन दळवी, तलाठी एम. एन. उभाळ, ग्रामसेवक पी. एस. भवाळ, पोलीस पाटील वंदना काळे हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृषी सहाय्यक गजानन दळवी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारी पिक विमा केल्म व क्राॅप इन्सुरन्स विमा याॅपची माहीती व प्रात्यक्षिक गजानन दळवी यांनी करून दाखवले. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली गावातुन फेरी करून विशाल मुंदे या शेतकऱ्यांच्या शेतशिवारात भेट देऊन तेथील पिक परिस्थिती जाणून घेतली. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची माहीती घेऊन नुकसान भरपाई अनुदान ची माहीती व ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवला आहे त्यांनी अँफ मार्फत तक्रारी नोंदविण्याचे आव्हान केले. यावेळी उपस्थित शेतकरी शेतमजूर यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
या बैठकीचे संचालन व आभार प्रदर्शन संदिप तंबाके यांनी केले. या कार्यक्रमाला योगेश चौधरी, संतोष खारोळ, रमेश काळे, प्रविण यादव, पुंडलिक शेंडे, उमेश काळे, दत्ता सोळंके, गजानन चौधरी, किशोर ठाकरे, राम होले, लक्ष्मण चतुरकर, विशाल मुंदे, नाना घुले, संतोष राऊत, सावंत सोनुने, भाऊ रामटेके यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...