लोणी बसस्टॅण्ड वर "रोडरोमीयोंचा" धुमाकूळ

शालेय विद्यार्थिनींना सहन करावा लागतो मानसिक त्रास आर्णी पोलिसांनी लक्ष देण्याची गरज जवळा:- आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोणी येथे जिल्हा परिषद विद्यालय व महाविद्यालय, व राष्ट्रीय माध्यमिक,व उच्च माध्यमिक आश्रम शाळा अशा दोन शाळा आहे.या शाळेमध्ये खेड,अकोला व देवगाव या गावावरून विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेण्याकरिता येतात.
या शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी अँपे तर विद्यार्थिनींना मानव विकास कार्यक्रम अंतर्गत येणारी बस.पण शाळेला ५ वाजता सुट्टी होते.विद्यार्थिनींना घरी पोहचवणारी बस ही दिग्रस डेपोची असल्यामुळे तिला यायला अर्धा तास लागतो.त्या अर्ध्यातासात लोणी बसस्टॅण्ड वर रोडरोमीयोंकडून धुमाकूळ घातला जातो.व मुलींना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
या विद्यार्थिनींच्या पालक वर्गांच्या परेशानीतही वाढ झालेली आहे.त्यामुळे मुलीला शाळेत पाठवावे की,नाही असा संभ्रम पालकांमध्ये निर्माण झाला आहे.या घटनेमुळे अनेक विद्यार्थिनींच्या शिक्षणावर परिणाम होणार असून अशा विद्यार्थिनींना शिक्षणा पासून मुकावे लागणार आहे,तरी आर्णी पोलिसांनी वेळीच लक्ष देऊन,कोणताही अनुचित प्रकार घडण्याअगोदर या रोडरोमियोवर कारवाई करून पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी पालकवर्गांकडून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...