महाराष्ट्र योग शिक्षक संघ विदर्भ प्रदेश समितीवर प्रा. नरेंद्र ढोकणे यांची नियुक्ती

जवळा:-महाराष्ट्र योग शिक्षक संघ योग क्षेत्रात कार्यरत असून मानवाचा सर्वांगीण विकास आणि उत्तम स्वस्ध्यारिता संपूर्ण महाराष्ट्रात योगाचा प्रचार आणि प्रसार करणे योग शिबिर व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करणे. तसेच प्रशिक्षित योगशिक्षक निर्माण करण्याचे कार्य सातत्याने महाराष्ट्रभर करीत आहे.
महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या विदर्भ प्रदेश कार्यकारणीचे गठन करण्यात आले. त्यात प्रा. नरेंद्र ढोकणे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांची निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. मनोज नीलपवार, डॉ. गणेश सवालाखे ( विदर्भ प्रदेश अध्यक्ष),
श्री शरद बजाज (यवतमाळ जिल्हाध्यक्ष), तसेच महाराष्ट्र तथा विदर्भ प्रदेश कार्यकारणीतील सदस्यांनी सर्वानुमते केली. प्रा. नरेंद्र ढोकणे यांच्या योग क्षेत्रातील कार्याची दखल घेत ही निवड झालेली आहे. त्याकरिता त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...