आर्णी येथे समन्वय सुसंवाद शांतता समितीची सभा
आर्णी (ता.प्र.) येथील पोलीस स्टेशनच्या वतीने दुर्गा उत्सव, शारदा उत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, ईद ए मिलाद इत्यादी सण उत्साहात आनंदात साजरे करण्यात यावे यासाठी माहेर मंगल कार्यालय येथे समन्वय व सुसंवाद शांतता समितीची सभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय पोलीस अधिकारी दारव्हा येथील डॉ. आदित्य मिरखेतकर, तहसीलदार परशराम भोसले, माजी नगराध्यक्ष आरीज बेग, नायब तहसीलदार उदय तुंडलवार हे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार पितांबर जाधव यांनी केले. त्यानंतर राजु बुटले, छोटु देशमुख, युनुस शेख, आरीज बेग, डॉ. आदित्य मिरखेतकर यांचे मनोगत झाले. शेवटी अध्यक्षीय मनोगत पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांचे झाले. त्यांनी सांगितले की सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सर्वाची एकजुट व्हावे. दुर्गाउत्सव मंडळाने उत्सवा दरम्यान बेटी बचाओ,व्यसनमुक्ती, समाजप्रबोधन आदी उपक्रम राबविण्यात यावे. एकमेका बध्दल सकारात्मक विचार करावा. उत्सवा दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राहवी असे त्यांनी सांगितले.तसेच येथील पोलीस स्टेशनला मिळालेल्या जागेवरचे मी भुमीपुजनाचे नारळ फोडून जाणार असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे संचालन अजय छल्लाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपतराव काळुसे यांनी केले. या कार्यक्रमाला कांतीलाल कोठारी, पोलीस पाटील विष्णू इंगोले, भाऊ पटेल, विठ्ठल देशमुख, विलास वातिले, खुशाल ठाकरे, विशाल देशमुख, सचिव यलगंधेवार,अरूण राठोड, रवि चव्हाण, मनोज चव्हाण, प्रल्हाद इंगळे, दत्ता सिमरे, राजु राठोड, उमेश रावते, विजय बुटले, सुरेश साखरकर, संजय काळे, राजेश देशमुख, नरेश गावंडे, यांच्यासह आदी पोलीस पाटील, दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, शांतता समितीचे सदस्य, पोलीस मित्र पोलीस कर्मचारी ,पत्रकार उपस्थित होते.
आर्णी येथे समन्वय सुसंवाद शांतता समितीची सभा
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा