#आर्णी येथे जंगी स्वागत
जवळा:
पिंटू शिंदे यांची शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. असून विशेष आर्णी शहरांमध्ये दि.२४/९/२०२२रोजी शिवसैनिकाकडून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री. पिंटू शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जेसीपी मशीनद्वारे फुलांची उधळण करून शिंदे यांच्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात मुख्य मार्गावर मिरवणूक काढण्यात आली यावेळी संपूर्ण आर्णी तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचा उत्साह एवढा होता की नवनियुक्त जिल्हाध्यक्षाची लाडू तुलाही करण्यात आली. शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी श्री पिंटू शिंदे यांची यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड करताच शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत होते. पिंटू शिंदे यांची सर्वसामान्यांचा माणूस अशी ओळख असून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी ते कशी पेलतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, कारण आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पिंटू शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड गेम चेंजर ठरेल अशी जनतेत भावना आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातून
शिवसेना यवतमाळ जिल्हा सपर्कप्रमुख बाळासाहेब मुंगिनवार, तालुकाप्रमुख रवी राठोड, शिवसेना शहर प्रमुख पंकज शिवरामवार,रमेश ठाकरे, उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी सविता बेंद्रे,तालुकाप्रमुख सविता राठोड, गणेश बोक्से, पवन वाघमारे, उत्तम राठोड, लिंगाजी मंगाम, अमोल जाधव, उज्वल मोरे, आनंद शिंदे, मंगेश बुठले, अनिल चौधरी, संजय कवटकर, संतोष चोपडे, अमोल ठाकरे, गणेश एकंडवार, आशिष राठोड, आशिष निरपाशे,विनोद कालंनकार, उमेश ढाकूरकार, शेख राहील, शेख रियान, रवी जिचकार, प्रशांत चोपडे, विक्की गारशेलवार, निखिल खारोळ, किसन पवार शिवसैनिक आदी उपस्थित होते
पिंटू शिंदे यांची शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा