**एसबीआय तर्फे मृतकाच्या कुटुंबाला दहा लाखाचा धनादेश**
आर्णी तालुक्यातील जवळा येथील भारतीय स्टेट बँक सुभाष खंदार यांनी 2021 मध्ये वार्षिक एक लाख रुपये प्रमाणे पाच वर्ष भरणा करिता वेल्थ बिल्डर ही पॉलिसी काढली होती. व त्याचा पहिला एक लाख रुपयाचा हप्ता भरला होता. दुर्दैवाने त्यांचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने त्यांची पॉलिसी स्टेट बँकेच्या मॅनेजरला दाखविली व त्यांनी या निराधार कुटुंबाला दहा लाख रुपयाची पॉलिसी मिळवून दिली. अगदी सामान्य परिस्थितीत ऑटो रिक्षा चालून आपल्या परिवाराचा चालवीत असे. सुभाष खंदार यांनी आपल्या कमाईतून कुटुंब चालून काही पैशाची बचत केली व त्यातूनच त्यांनी एक लाख रुपयाचा वार्षिक पाचवर्षा करिता जवळ येथील स्टेट बँकेत विमा काढला. त्या विम्याच्या पहिला हप्ता भरल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुली आहे. एका मुलीचे लग्न झाले तर दुसऱ्या मुलीचे लग्न तोंडावर आले असताना त्यांना मृत्यूने कवटाळले अशातच परिवाराची सर्व जबाबदारी त्यांची पत्नी नंदाबाई सुभाष खंदार यांच्यावर आली सामान्य परिस्थितीवर मात करून आजच्या काळात मुलीचे लग्न करणे म्हणजे बँक बॅलन्स असणे आवश्यक आहे. मात्र पतीच्या आजारापणाला जवळचे सगळे पैसे गेल्यावर जीवन जगणे कठीण झाले त्याचाच सुभाष खंदार यांनी करून ठेवलेल्या पॉलिसीमुळे परिवाराला मोठा आधार मिळाल्याची प्रतिक्रिया नंदाबाई यांनी दिली या पॉलिसी रक्कम पीडित कुटुंबाला मिळावी याकरिता जवळा येथील भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर डिके दास, सर्विस मॅनेजर राज सोळंके, फिल्ड ऑफिसर हर्षल गुप्ता, सीनियर लिपिक अखिलेश भिसे, ज्युनिअर लिपिक पराग गुप्ता व कर्मचारी उमेश चोपडे, अविनाश संगमवार, हरीश रजनकर, सीएससी विजय धोत्रे, निलेश जाधव यांनी प्रयत्न केले यावेळी जवळा येथील सरपंच , पत्रकार व गावकरी कार्यक्रमाला उपस्थित होते.
एसबीआयच्या 'वेल्थ बिल्डर' पॉलिसीमुळे मृतकाच्या कुटुंबाला दहा लाखाचा धनादेश
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा