गटशिक्षणाधिकारी किशोर रावते.
आर्णी.
शैक्षणिक प्रक्रिया राबवताना ज्या काही समस्या शिक्षकांना येतात त्यात आंतरप्रक्रियेतून संवाद होऊन उपाय शोधले जातात या कारणे शिक्षण परिषदेत महत्त्वाची आहे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी किशोर रावते यांनी केले.
नुकतीच जवळा येथे 29 सप्टेंबर 2022 ला
ठाकूर ग्रुप ऑफ एज्युकेशन जवळा तालुका आर्णी शिक्षण विभाग पंचायत समिती आर्णी केंद्र जवळा २ आणि लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद आयोजन करण्यात आली होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी सेवक गोविंदरावजी भिसे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी किशोर रावते, विस्ताराधिकारी भगत मॅडम,केंद्रप्रमुख राजीव परमार,केंद्रप्रमुख गजानन शेलोकार, यांची उपस्थिती होती.
यावेळी शैक्षणिक बाबीवर चर्चा करण्यात आली.
स्पर्धा परीक्षेतून यश कसे साध्य करावे या विषयावरही शिक्षकांनी आपापली मते मांडली तर शिक्षणाचे बदलते प्रवाह याबाबतीत बीआरसी विषय तज्ञ माधुरी चद्रे मॅडम, अर्चना खोडके, सुलोचना राऊत यांनी विशेष सापेक्ष चर्चा घडवून आणली.
शिक्षण परिषद ही शिक्षकांना शैक्षणिक कार्य करण्याची प्रेरणा देते असा सुर यावेळी ऐकायला मिळाला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले तथा स्वर्गीय भारत सिंह ठाकुर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी केलेल्या या शिक्षण परिषदे ची सांगता वंदे मातरम या गीताने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद गावंडे सर शेकलगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन
तंबाके लोणी यांनी केले
या शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
शिक्षण परिषद हे शैक्षणिक समस्या सोडविण्याचे माध्यम_
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा