सहाय्यक पोलीस निरीक्षकाला हादरला आर्णी तालुका..

सहाय्यक पोलीस निरीक्षकाला हादरला आर्णी तालुका... ऐका महिन्यापासून सर्व अवैध धंदे बंदच.. मटका जुगार दारू व्यवसायीकात दहशत.. आला रे आला सिंघम आला. वारे पोलीस...
भगीरथ राजा 24 फोर न्यूज प्रतिनिधी गणेश एकंडवार आर्णी पोलीस स्टेशनला गेल्या सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत काळुसे यांनी अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दनाणून टाकले आहे. अवैद्य व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेला आर्णी तालुका आज मात्र या अवैद्य व्यवसायापासून मुक्त झाला आहे गेल्या १५ वर्षापासून जवळा येथील कधी बंद न होणारा मटका, जुगार,अवैध दारू,वाळू तस्करी व महाराष्ट्र प्रतिबंधित असलेला घुटका सुगंधित तंबाखू हे सगळे बंद झाले आहे जे लोक हे अवैध व्यवसाय करीत होते त्यांना काही लोकांनी मागणी केली असल्यास काळुसे साहेब कारवाई करतो असे उद्गार येकायला मिळत आहे व आम्ही विकणे बंद केले आहे असे सांगून गिराईकला वापस पाठवीत असल्याची चर्चा काही सूत्राच्या आधारे मिळाली आहे तर केवळ अवैध व्यावसायिकांच्या मनात भीती पसरली असून सर्व सामान्य माणसाच्या मनामनात मात्र काळुसे बद्दल ऐक वेगळीच प्रतिमा निर्माण झाली आहे व गावकरी ,प्रतिष्ठित नागरिक,काही गावातील सरपंच त्यांना गावोगावी बोलावून त्यांचा सत्कार करीत आहे त्यामुळे प्रत्येक तालुक्यात असा ऐक पोलीस असावा अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे..
तर काळुसे येईल. अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला जर प्रतिबंधित माल ग्राहकांनी मागितला तर हळू बोल नाहीतर काळुसे येईल अशी चर्चा आर्णी तालुक्यात जोमाने सुरू आहे व तसेच अवैध दारू विक्रेते सुध्दा आपले ठिकाणे बदलून व्यवसाय करीत आहे आणि जुगरिनी तर जुगारच खेळणे बंद केले आहे सापडलो तर सोडणार नाही त्यामुळे आज आर्णी तालुक्यातील जनतेने सुटकेचा श्वास घेतला आहे..
अत्याचार नको.. मी आर्णी तालुक्यात पदभार स्वीकारल्यानंतर ३ महिने आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावाबद्दल माहिती घेतली बरेच गाव अवैध व्यवसायापासून मुक्त दिसले मात्र काही गावात या अवैध व्यावसायिकांचा अत्याचार दिसून आला त्यामुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलून कायदेशीर कारवाई केल्या आज बऱ्यापैकी शांतता सुव्यवस्था दिसून येत आहे याबद्दल गावोगावी बोलावून नागरिक मला मान देत आहे त्यातूनच मला माझ्या कर्तुत्वाची पोच पावती मिळत आहे तरी कोणत्याही नागरिकाला वाठले की तेच ते अवैध व्यावसायिक पुन्हा अवैध व्यवसाय करून चौकात किंव्हा घरात जमाव करून अवैध व्यवसाय करून दहशत निर्माण होईल असे कृत्य करीत असेल तर ऐक फोन करा कडक कारवाई केली जाणार... सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत काळुसे पोलीस स्टेशन आर्णी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...