अंबक येथील तरुणीला घोणस अळीचा दंश

कोरोनाच्या विख्यातून कसबसं सावरत असताना घोणस नावाच्या अति विषारी अळीचे संकट आता समोर आले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी बीड येथील एका शेतकऱ्याला या आळीने दंश केल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना तशीच अळी सांगली जिल्ह्यात आढळली आहे.
अंबक (ता. कडेगाव) येथील शेतातील घरात राहत असलेल्या कुटुंबातील अश्विनी जगदाळे (वय 20) या तरुणीच्या पायाखाली घोणस आळी सापडल्याने व आळीचा दंश तळपायाला झाल्याने तिला चिंचणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला घोणस आळीने दंश केल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता हे संकट सांगली जिल्ह्यात आल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.अंबक येथील अश्विनी नंदकुमार जगदाळे हि युवती रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घराबाहेर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेली होती.
यावेळी घराजवळ असलेल्या गवतात असलेल्या घोणस नावाच्या विषारी आळीवर तिचा पाय पडला यावेळी अश्विनीच्या तळपायाला अळीने दंश केला व अळीच्या अंगावरील काटे तळपायाला टोचले. यानंतर वेदना असंह्ह झाल्यांन तिला चिंचणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी चिंचणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले अश्विनीच्या आईने ही अळी प्लास्टिकच्या पिशवीतून डॉक्टरांना दाखविण्यासाठी रुग्णालयात आणली होती. यावेळी ती घोणस अळी असल्याचे स्पष्ट झाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...