जवळा : गणेशोत्सव, नवरात्र हे उत्सव शांततेत पार पाडण्यात यावे यासाठी जवळा बीटच्या वतीने राधे कृष्ण मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपतराव काळुसे, त्यांनी सांगितले की कोणाला हि जबरदस्तीने वर्गणी मागु नये. गणपतीउत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनीक गणेश मंडळाने पोलीस स्टेशनकडुन परवानगी घ्यावी. उत्सव साजरा करताना उत्सवा दरम्यान सामाजिक उपक्रम राबविण्यात यांवे. गरजु मुलांना पुस्तके वाटप, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आदी उपक्रम घ्यावे. वर्गणीतून जमा केलेला पैसा समाज कार्यासाठी खर्च करा. डीझेवर बंदी आहे. चुकीची प्रथा बंद करा. पारंपारिक वाद्याच उपयोग करून मिरवणूक काढावी. कायद्याचे पालन करा असे त्यांनी बैठकीदरम्यान मार्गदर्शन केले. यावेळी गावातील नागरिक व पोलीस पाटलांनी गुरखा यांचे मागील झालेल्या खुण प्रकरणात फोटो काढून पोलिसांना मदत करणारे नागरिककाचे कर्तव्यदक्ष काम बजावणारे गुरख्याचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपतराव काळुसे,प्रदीप खडसे, जवळा बीडचे विविध गावातील संपूर्ण पोलीस पाटील तसेच पत्रकार बांधव यांच्यासह गणेश मंडळातील सदस्य आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.
जवळा येथे शांतता समितीची बैठक संपन्न
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा