आर्णी तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना तात्काळ निधी वाटप करा

आर्णी तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना तात्काळ निधी वाटप करा
दि.29/09/2022 रोजी, आर्णी तालुक्यातील अतिवृष्टीचे अनुदान तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेले नाही. अतिवृष्टी चे अनुदान तत्काळ शेतकऱ्यांना मिळावे. यासाठी निवेदन आर्णी तहसील चे तहसीलदार मा. गजभिये साहेब यांना देण्यात आले. निवेदन देताना भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका प्रेम राठोड व बंजारा एकता परिषद चे अध्यक्ष श्री किसनभाऊ राठोड, भाजपा ज्येष्ठ नेते गोवर्धन जी राठोड, राहुलजी सोयाम, जिल्हा सचिव भाजपा, प्रकाश राठोड जिल्हा सचिव, उमेश चावरे, तुषार गभने, सूरज राठोड, अमोल पवार, संतोष चव्हाण, व अनेक भाजपा व बंजारा एकता परिषद चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*प्रतिक्रिया* आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांना आजपर्यंत अतिवृष्टी चे अनुदान मिळाले नसुन, शासनकडून शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी चे पैसे तालुक्याला, जिल्ह्याला प्राप्त झाले असून, आर्णी तहसील कडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या बनविण्यासाठी टाळाटाळ होत असताना दिसत आहे, कृषी अधिकारी व तलाठी हे सांगताना दिसत आहे की याद्या बनविणे आमचे काम नाहीं, एकमेकावर ढवला ढवल चालू आहे. आणि अधिकाऱ्यां च्या आट्टहसापायी, कामचुकारपना, सामान्य शेतकरी आर्थिक विवंचेत सापडलेला आहे. या या संदर्भात काल दी.29/09/22 रोजी मा. गजभिये साहेब तहसीलदार आर्णी यांना भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते कडून निवेदन देण्यात आले, तत्काळ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या बनवून, शेतकऱ्याच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदान टाकण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आले.
प्रेम राठोड माजी निष्ठावंत भाजपा तालुका सचिव आर्णी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...