जवळा
आर्णी तालुक्यातील जवळा येथील तलाठी यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून निलंबन करण्यात आले. याबाबत झालेले निलंबन रद्द करण्यासाठी जवळा येथील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते. यावेळी त्यांनी तलाठी देवधर यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जवळा येतील तलाठी रामचंद्र देवधर यांचे पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांची के.वाय.सी देण्यासाठी अनियमितता ठेवल्याचे कारण सांगत ५ सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयाने निलंबित केले होते. सदर निलंबन प्रकरणी जवळा येथील शेतकऱ्यांनी तलाठी देवधर यांनी केलेल्या कामकाजामध्ये समाधान व्यक्त करीत त्यांची बाजु दिलेल्या निवेदनात मांडली. तसेच या केवायसी जोडण्यासाठी तलाठी यांना दिलेल्या मुदतीच्या आधीच देवधर हे आई वारल्यामुळे रजेवर गेल्या नंतर पुन्हा रुजू झाले होते. शेतकऱ्यांनी तलाठी देवधर हे त्यांच्या कामात सदैव तत्पर असून शासकीय योजनांची माहिती वेळोवेळी देत असल्याने तसेच शेतकऱ्यांना त्यांचे झालेले निलंबन रद्द करण्यात यावे नाहीतर जवळा येथील शेतकरी आमरण उपोषण करील असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले
जवळा येथील तलाठ्याचे निलंबन रद्द करा शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा