बांधातील पाणी थोपल्यामुळे शेतकऱ्यांचा रस्ता बंद

#शेतकऱ्यांना जाण्या-येण्या करीता जाबनाल्याचे पाणी रोकल्यामुळे रस्ता बंद #तहसीलदाराकडे तक्रार दाखल
आर्णी तहसील मध्ये जवळा हे गाव येत असून शासनाच्या जलसिंचन विभागाच्या पाणी आडवा पाणी जिरवा योजनेअंतर्गत जाब नाल्यावर बांध टाकलेला आहे. परंतु शेतकऱ्यांना या नाल्यामधून शेतात जाणे येणे करावे लागते.
या पाण्यामुळे या रस्त्यावर जवळपास तीन ते चार फूट पाणी साचून राहते त्यामुळे हा रस्ताच शेतकऱ्यांना जाणा येण्याकरिता बंद झाला आहे. असे शेतकऱ्याचे मत आहे. सध्या पीक काढण्याचा हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होण्याचा संभव आहे. किंबहुना पाण्यातून जाणे येणे केल्यामुळे जीवित हानी सुद्धा होऊ शकते
त्यामुळे पाण्याचा प्रभाव रोखुन राहू नये म्हणून काही व्यवस्था शेतकऱ्याला शेतामध्ये जाण्या येण्याकरिता करून द्यावी किंवा त्या बांधामध्ये पाणी थोपून राहू नये म्हणून पर्यायी योग्य ती व्यवस्था करावी किंवा ज्या रस्त्याने आम्ही जाणे येणे करतो तिथे सिमेंट पाईप टाकावे असे निवेदन जवळा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...