सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची बाजार समितीच्या यार्ड मध्ये गर्दी

सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची बाजार समितीच्या यार्ड मध्ये गर्दी
आर्णी (ता.प्र) शेतकऱ्याजवळ खर्चासाठी पैसा नसल्याने शेतकरी शेतातील सोयाबीन काढुन विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड आणत असल्यामुळे शेतकऱ्यांची तेथे गर्दी दिसून येत आहे.
शेतकऱ्यांना दर वर्षी येणाऱ्या संकटाशी सामना करावा लागतो. यावर्षी अतीवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यात पुन्हा परतीचा पाऊस झाल्याने नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. शेतकरी सोयाबीन काढुन विक्रीसाठी आणत आहे. सोयाबीनची आद्रता (ओलावा) पाहून व्यापारी खरेदी करीत आहे असे शेतकऱ्यांकडुन बोलल्या जात आहे.२९ आँक्टोबर शनिवार ला व्यापाऱ्यानी शेतकऱ्यांकडील सोयाबीन ४००० ते ४८००रूपये क्विंटल भावाने खरेदी केले
.शेतकऱ्यांजवळ पैसा नसल्याने व सोयाबीन काढणीचे मजुरीचे पैसे देण्यासाठी शेतकरी सोयाबीन विकताना दिसत आहे. सोयाबीन ची आवक वाढल्यामुळे भाव कमी झाले. शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे.असे शेतकरी यांच्या कडुन बोलल्या जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...