जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा:राजीव विरखेडे माजी सभापती

जवळा: सलग दोन महिन्यांपासून होणाऱ्या पावसामुळे शेतात कंबरएवढे पाणी आहे. सत्तर वर्षांत झाली नाही एवढी अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आर्णी चे माजी सभापती राजीव विरखेडे यांनी केली आहे. गुरंढोरं मेली, पीक गेली, घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्यामुळे सरकारने तातडीने सरसकट सर्वे करून मदत जाहीर करावी,अशी मागणी रविवारी पत्रपरिषदेतून करण्यात आली. 'विशेषत: आर्णी तालुक्यात पावसाने शेतकऱ्यांना पूर्णत: उद्ध्वस्त केले. निवडणुका घ्या, परंतु शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका. अन्यथा या काळातही रस्त्यावर उतरून आंदोलन करू,' असा इशाराही राजू विरखेडे यांनी दिला.
ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, सडून गेली, शेती खरडून गेली, बांध्या फुटल्या, शेतातील विहिरी खचल्या. सोयाबीन, तूर हातातून गेले, संत्र्याच्या आंबिया बहाराचे पूर्ण नुकसान झाले, कपाशीला काही ठिकाणी फुले व पात्या नसल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून ५० हजारांची मदत करावी. संत्र्याला हेक्टरी १ लाख, खचलेल्या विहिरीला २ लाख आणि शेती वाहून गेली त्यांना ५० हजार अशी मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.
कोट...... आर्णी तालुक्यात सलग १२ वेळा अतिवृष्टी झाली.त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.शासनाने एवढ्या मोठ्या नुकसानाची तोकडी मदत जाहीर करून ती ही वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली.तरी शासनाने जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत जाहीर करावी. राजीव विरखेडे,माजी पंचायत समिती सभापती आर्णी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...