अकोल्यात भागवत कथेतून संत संगतीचा सोहळा

अकोल्यात भागवत कथेतून संत संगतीचा सोहळा # नाचू कीर्तनाचे रंगी,ज्ञानदीप लावू जगी # श्री विठ्ठल रुक्मिणी समितीचे आयोजन
जवळा:-आर्णी तालुक्यातील गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अकोला येथे श्री विठ्ठल-रुख्मिणी संस्थान समिती यांच्या तर्फे कार्तिक पौर्णिमे निमित्त श्रीमद भागवत गीता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे,जळतील पापें जन्मातरीची संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी नामाचा महिमा सांगितला आहे.अगदी सोपे असलेले ईश्वराचे नाव त्यांनी उलगडून दाखविले आहे.भक्तिमार्गच माणसाला कल्याणाकडे घेऊन जातो.त्यांच्यात प्रेम,सदाचार,सात्विकता निर्माण होते.कुठलाही धर्म माणसाला घृणा शिकवत नाही.त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भागवत अन कीर्तन परंपरेतून समतेचे तत्वज्ञान च शिकवले जाते.
त्या पार्श्वभूमीवर २ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत अकोला श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञानयज्ञ व कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.भगवताचार्य ज्ञानेश्वर महाराज खेडकर यांच्या सुश्राव्य वाणीतून ही कथा भक्तांना ऐकायला मिळणार आहे.त्याची साथसंगात करण्यासाठी वाई येथील मृदूंगाचार्य सुनील महाराज टाले,तबला वादक अक्षय खंदारे,हार्मोनियम वादक अनंत थरकडे गोरेगाव व गायनाचार्य तुळशीदास माने बीड,मधुकर पत्रे खेड,उकंडराव जाधव आरंभी,गजानन महाराज,कैलास महाराज आरंभी व गावातील वारकरी मंडळी राहतील.दररोज सकाळी ५ ते ६ आरती होणार असून भागवत कथा सकाळी ८.३० ते १२ व दुपारी २.३० ते ५ वाजेपर्यंत होणार आहे.हरिपाठ सायंकाळी ५.३० ते ६.३० पर्यंत व कीर्तन रात्री ८ ते १० पर्यंत होणार आहे. महाप्रसाद ९ नोव्हेंबर ला सायंकाळी ५ वाजता राहणार असून या सप्ताहाचे आयोजन अमोल मोरेश्वर भोयर(पाटील) व गावकरी मंडळींनी केले आहे.
# असा रंगणार कीर्तनाचा सोहळा बुधवार दिनांक २ नोव्हेंबर ला रात्री ८ ते १० या कालावधीत सौ.पद्माबाई माऊली धामणगाव(देव) यांचे कीर्तन होणार आहे.गुरुवारी ३ नोव्हेंबर ला वारंगे गुरुजी लोणी यांचे प्रवचन असून शुक्रवार ४ नोव्हेंबर ला भावराव गावंडे महाराज आळंदीकर यांचे कीर्तन होणार आहे.शनिवार ५ नोव्हेंबर ला दिनेश महाराज बोबडे आळंदीकर,रविवार ६ नोव्हेंबर ला राजूभाऊ विरदंडे महाराज घाटंजी,सोमवार ७ नोव्हेंबर ला अडकोजी महाराज बाल भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम,मंगळवार ८ नोव्हेंबरला भीमराव महाराज खेड यांचे हरिकीर्तन राहील,व बुधवार ९ नोव्हेंबर ला दुपारी २ ते ४ वाजता ह.भ.प.व्यसनमुक्ती सम्राट मधुकररावजी खोडे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाचे समारोप होईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...