भरधाव कारची आपेला धडक.
नागपूर तुळजापूर महामार्गावरील दारव्हा फाट्याजवळील घटना.
अपघातात ४ वर्षीय चिमुकलीसह एक वृद्ध गंभीर तर ५ जण किरकोळ जखमी.
जवळा
नागपूर तुळजापूर महामार्गावर दारव्हा फाट्याजवळ २६ तारखेला ५ वाजताच्या दरम्यान एका भरधाव कारणे आपेला पाठीमागून धडक दिल्याने आपे पलटी होऊन त्यात एक ४ वर्षीय चिमुकलीसह एक वृद्ध गंभीर जखमी झाले तर पाच जण किरकोळ जखमी झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की २५ तारखेला ५ वाजताच्या दरम्यान प्रवाशांनी भरलेला अप्पे क्रमांक एम एच २९ ए एम ००१४ हा प्रवाशांनी भरलेला आपे जवळा वरून दारव्हा जात असताना पाठीमागून भरधाव येणारी कार एम एच ०४ इ क्यू ८८०३ ने धडक दिल्याने आपे पलटी झाला यात एक वृद्ध आपल्या दोन नातीला हिवरी वरून महागावला आणत असताना त्या वृद्धासह त्याची ४ वर्षीय नात गंभीर जखमी झाली आहे बाबाराव शेंद्रे वय ६० वर्ष राहणार महागाव व जयश्री फुंने वय ४ वर्ष राहणार हिवरी असे गंभीर जखमींचे नाव असून त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे तर प्रियंका आत्राम, मीरा आत्राम,नामदेव आत्राम, सर्व राहणार उचेगाव तसेच वर्षा गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाड राहणार लोणी या किरकोळ जखमींना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले तर भरधाव कार चालकाचे नाव संदेश पाटील वय 23 वर्ष राहणार ब्राम्ही असे आहे तर केशव सोनवणे राहणार दारव्हा असे आपे चालक मालकाचे नाव आहे घटनास्थळी बराच वेळ आर्णी पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित न झाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला तर वृत्त लीहोस्तर कोणताही गुन्हा नोंद झाला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांच्या आधारे मिळाली.
भरधाव कारची आपेला धडक.
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा