लोणी येथील युवा शेतकऱ्याने,निसर्गाशी खेळलेला जुगार

लोणी येथील युवा शेतकऱ्याने,निसर्गाशी खेळलेला जुगार जिंकला # प्रती बॅग १० क्विंटल चे उत्पादन # प्रती क्विंटल किमान ७ हजार रुपये भाव मिळण्याची अपेक्षा
जवळा:- आर्णी तालुक्यातील लोणी येथील युवा शेतकरी उत्तम जाधव याने निसर्गा शी खेळत असलेला जुगार जिंकून कोरडवाहू शेतीत प्रती बॅग १० क्विंटल असे ३ बॅग ला ३० क्विंटल सोयाबीन पिकाचे चे उत्पादन घेतले आहे.सविस्तर वृत्त असे की,आर्णी तालुक्यातील लोणी येथील २१ वर्षीय उत्तम याचे वडील डोमाजी जाधव हे १५ वर्षा पूर्वीच आजाराने मारण पावले.उत्तम याच्या वडिलांच्या मृत्यू नंतर आई अनुसया ही आजरी पडली.तिला कमरेचा आजार झाल्यामुळे तिचे तीन वेळा ऑपरेशन करण्यात आले पण तरीही ती चालू शकली नाही.व दोन्ही भावाचे लग्न झाल्यानंतर उत्तम व त्याची आई अनुसया हे राहत होते.स्वतःची शेती नसल्यामुळे रोजमजुरी करून उत्तम त्याची आई व त्याचे पोट भरत होता.
खेळण्या च्या दिवसात उत्तम याच्यावर जबाबदारीचे ओझे येऊन पडले.व अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगताना उत्तम याने मक्तेदारीने शेती करण्याचा निर्धार केला.लोणी येथील शेतकरी गुलाबराव चौधरी यांची ३ एकर शेती उत्तम याने त्याचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर याच्या मदतीने मक्तेदारीने केली.शेतीचा कोणताही अनुभव नाही होता.आणी पहिलीच वेळ शेती करणे,व याचं वर्षी तालुक्यात सलग १२ वेळा अतिवृष्टी होने जणू उत्तम साठी निसर्गाचा कोपच होता.तरीही धीर न सोडता मेहनत करणे सोडले नाही.व त्याचा मेहनतीचे फळ आज त्याला मिळाले.प्रती बॅग १० क्विंटल असे ३ बॅग ला ३० क्विंटल सोयाबींन चे उत्पादन उत्तम याने घेतले.त्याचा या मेहनतीचे लोणी ग्रामवासियांकडून कौतुक केले जात आहे.
कोट...... भारत हे कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.पण येथील बळीराजा अत्यंत सुखावला आहे.एवढी मेहनत करूनही शेतकऱ्यांच्या मालाला मोल नाही आहे.महागाई वाढलेली असताना शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची होत चालली आहे.रात्र-दिवस मेहनत करून सोयाबीनला ४००० हजार रुपये भाव आहे.तरी शासनाने शेतकऱ्यांची मेहनत पाहून सोयाबीन ला किमान ७००० हजार व कापसाला किमान १२००० रुपये भाव द्यावा. उत्तम जाधव,युवा शेतकरी लोणी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...