आर्णी (ता.प्र.) येथील जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने विठ्ठल रूख्मिनी मंदिराच्या सभागृहात जेष्ठ नागरीक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजाननराव घोडेराव तर प्रमुख पाहुणे म्हणून पुरूषोत्तम गावंडे, म. द. भारती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निवृत्ती पिस्तुलकर, प्रा. सुनिल चोरडिया, पुरस्कार प्राप्त तलाठी शाम रणनवरे, विनायकराव थोडगे,किशोर उपलेंचवार, शितल लाड, सविता मुनगीनवार हे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद सरोदे यांनी केले. त्यानंतर जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने गजाननराव घोडेराव, पुरूषोत्तम गावंडे, प्राचार्य डॉ. निवृत्ती पिस्तुलकर, प्रा. सुनिल चोरडिया, शाम रणनवरे,शितल लाड, सविता मुनगीनवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पांडुरंग ब्रम्हकार, प्रशांत लिंगावार यांचे मनोगत झाले. त्यानंतर प्रमुख डॉ. निवृत्ती पिस्तुलकर यांचे मार्गदर्शन झाले. त्यांनी सांगितले की नव्या पिढीनेपुढे येवुन जेष्ठाचे गुणगुणा करायला पाहिजे. एकञ येवुन आपले सुख दुख एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. आपले आरोग्य चांगले राहले पाहीजे याकडे लक्ष देऊन आनंद राहल पाहीजे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रणिता चिंतावार यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप तायडे यांनी केले.या कार्यक्रमाला किशोर उपलेंचवार, अरविंद सरोदे, पांडुरंग ब्रम्हकार, प्रशांत लिंगावार, विलास पदमावार, बाबुलाल रत्ने, अरूण रेचे, गुलाबराव ठाकरे,प्रभाकर वानखेडे, कृष्णराव गोविंदवार, रेणुराव बोंपीलवार, सतिश देशमुख,यादवराव ठाकरे, विलास वातिले, कांतीलाल कोठारी, अजाबराव बुटले,श्रीकृष्ण जावळकर,सतिश देशमुख,बंडु कोषटवार, उत्तम मुंडवाईक, सिताराम गावंडे, डॉ. कुमुदिनी नाफडे, माया चिंतावार, छाया चौधरी, सुनिता , आशा पदमावार, अर्चना लिंगावार, सरला उपलेंचवार, सुक्ष्मा चिद्दरवार, मंजुषा जिल्हेवार यांच्यासह आदी उपस्थित होते.
आर्णी येथे जेष्ठ नागरिक दिन साजरा
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा