नागरिकांनो भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा

नागरिकांनो भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा
# माजी सभापती राजीव विरखेडे याचे आवाहन
जवळा:- काँग्रेस चे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नुकतीच महाराष्ट्रात दाखल झाली आहे या यात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती राजीव विरखेडे यांनी केले आहे.देशात समता,न्याय,बंधुतेचा विचार रुजवण्याची गरज आहे.सध्या जाती धर्मात द्वेष पेरण्याचे काम काही संघटना व पक्ष करित आहे.देशातील लोकात प्रेमभावना वाढविण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. येत्या १५ नोव्हेंबर ला वाशीम जिल्ह्यात पोहचणाऱ्या या यात्रे मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे.
काँग्रेस नेते राहुल यांची यांची भारत जोडो यात्रा येत्या १५ नोव्हेंबरला वाशीम जिल्ह्यात पोहचत आहे.
या यात्रे मध्ये केवळ पक्षाचे नव्हे तर अनेक साहित्यिक पत्रकार सहभागी झाले आहे.काँग्रेस च्या वतीने त्याच ठिकाणी बिरसा मुंडा जयंती साजरी केली जाणार आहे,त्यामुळे आदिवासी बांधवानी सुद्धा मोठ्या प्रमाणात या यात्रे मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राजीव विरखडे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...