देवगाव येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

फोटो आहे.......... भव्य मिरवणुकीतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन # आदिवासी उत्सव समितीचा उपक्रम # देवगाव येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
जवळा:- १५ नोव्हेंबर २०२२ रोजी आर्णी तालुक्यातील विविध ठिकाणी क्रांतिसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आर्णी तालुक्यातील देवगाव येथील भगवान बिरसा मुंडा चौक येथे सकाळी ९ वाजता भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून,आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान मुंगसाजी माऊली यांच्या आरतीने भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
भव्य मिरवणुकीतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवून क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या मिरवणुकीत हजारो आदिवासी बांधव आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभागी होत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. यावेळी आदिवासी समाजातील अनेक तरुणांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा अविष्कार सादर केला. तारफा नृत्य, पारंपरिक वाद्य आणि त्यावर ठेका धरणारे पारंपांरीक वेशभूषेतील तरुण हे मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.यावेळी आदिवासी उत्सव समितीचे अध्यक्ष करण शेलकर,उपाध्यक्ष निलेश माघाडे,सचिव स्वप्नील गोदमले,करण माघाडे,नितेश माघाडे,पवन शेलकर,राजेंद्र शिंदे,निखिल पारधी,अभय अंबुरे,सुरज नाटकर,गणेश खडके,अशोक खडके,अक्षय भरभडे, हिम्मत शिंदे,विक्रम मिरासे,कांता गोदमले,महानंदा अंबुरे,शिवानी शेलकर,योगिता शेलकर,निर्मला गोदमले,मेघा नाटकर,कमला शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...