जवळा येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

भव्य मिरवणुकीतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन # आदिवासी उत्सव समितीचा उपक्रम # जवळा येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
जवळा:- १५ नोव्हेंबर २०२२ रोजी आर्णी तालुक्यातील विविध ठिकाणी क्रांतिसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आर्णी तालुक्यातील जवळा येथील भगवान बिरसा मुंडा चौक येथे सकाळी 11वाजता भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून,आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान मुंगसाजी माऊली यांच्या आरतीने भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. भव्य मिरवणुकीतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवून क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या मिरवणुकीत हजारो आदिवासी बांधव आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. यावेळी आदिवासी समाजातील अनेक तरुणांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा अविष्कार सादर केला. तारफा नृत्य, पारंपरिक वाद्य आणि त्यावर ठेका धरणारे पारंपांरीक वेशभूषेतील तरुण हे मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.यावेळी आदिवासी उत्सव समितीचेशाखा अध्यक्ष विनोद उईके,उपाध्यक्ष दिनेश राजूरकर,कार्याद्यक्ष प्रशांत टेकाम,मार्गदर्शक गजानन टेकाम,सल्हागार् अतुल टेकाम,सदस्य अक्षय राजूरक,समाज सेवक दिनेश उईके,ओम टेकाम,आकाश टेकाम,रमेश टेकाम ,आकाश राजूरकर,सार्थक उईके,मिलिंद उईके,गणेश टेकाम,मनीष उईके,रवी कोवे,प्रतिक उईके,समीर उईके,वैभव टेकाम,आकाश उईके,अर्पण टेकाम, रुपेश मडावी,व समस्त बिरसा ब्रिगेड व आदिवासी बांधव उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...