घरकुल योजनेतील वंचित कुटुंबाचे पुन्हा सर्वेक्षण करा !
# लोणी येथील सरपंच प्रिया वारंगे यांची मागणी
# मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन
जवळा
प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र ड यादीमध्ये गरजु कुटुंबाला वंचित राहावे लागले आहे. या यादीमध्ये आँनलाईन सर्वेक्षणात अनेकांना वंचित राहावे लागले त्यामुळे शासनाने पुन्हा सर्वेक्षण करून प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या प्रपत्र ड यादीमध्ये वंचित कुटुंबाला समाविष्ट करावे अशी मागणी आर्णी तालुक्यातील लोणी येथील सरपंच प्रिया वारंगे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातुन केली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेची अमंलबजावणी करताना ग्रामीण भागातील कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाते. यामध्ये गरजु असलेल्या लाभार्थीची निवड केली जाते. मात्र आँनलाईन पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणात लोणी येथील आणखी काही गरजु कुटुंबाला प्रपत्र ड यादीमध्ये समाविष्ट केले नाही त्यामुळे अशा कुटुंबाला घरकुलापासुन वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे अशा वगळण्यात आलेल्या कुटुंबाचा पुन्हा सर्वेक्षण करुन त्यांना या योजनेचा लाभ द्यावा. तशा स्वरुपाचा आदेश देण्यात यावा अन्यथा ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी उपोषणाचा इशारा निवेदनातुन दिला आहे .( श.प्र)
घरकुल योजनेतील वंचित कुटुंबाचे पुन्हा सर्वेक्षण करा
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा