# पात्र घरकुल लाभार्थ्यांचे तहसीलदारांना निवेदन
# जवळा येथील अतिक्रमण धारकांची मागणी
शासन निर्णय २०१६ नुसार सर्वांना घरे या योजने अतर्गत जवळा गावातील सर्व अतिक्रमण धारकांना कायम करून व इतर पात्र असलेल्या लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतुन घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी आर्णी तालुक्यातील जवळा येथील अतिक्रमण धारकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
येथील ५३६ कुटुंब जवळपास ४०-४५ वर्षांपासून म्हणजेच हे सर्व कुटुंब २०११ पूर्वी पासून शासकीय
जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करीत आहे. हे सर्व अतिक्रमण धारक गट क्र. ५१२ (फ वर्ग जमीन) व गट क्र. २८८, ५०९ ई वर्ग शासकीय जमीनीवर
वास्तव्य करीत आहे. अतिक्रमीत जागेवर वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा पुरविल्या जात आहे . रस्ते, नाली लाइट, पाणी आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालयचा लाभ सुद्धा देण्यात
आला आहे. ग्रामपंचायतीची जी काही कर आकारणी जसे पाणी कर गृह कर विद्युत कर व इतर सार्वजनिक करांचा सर्व अतिक्रमण धारक नियमित पणे भरणा करतात.
२०१४ पूर्वी काही अतिक्रमण धारकांना इंदिरा आवास शबरी आवास रमाई आवास व अल्पसंख्यांक यांना . घरकुलचा लाभ देण्यात आला आहे.अतिक्रमीत ५३६ कुटुंबापैकी प्रपत्र व मध्ये ११८ कुटुंबाची व प पत्र मध्ये २२३ अशी एकूण ३४१ कुटुंबाची
प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून निवड झाली आहे. २०१८ मध्ये प्रपत्र करिता एकूण ८६८ घरकुलाचा लाभ मिळण्या करीता पं.स आर्णी येथे यादी दिली असता या पैकी फक्त ४६७ लाभार्थ्यांचा सर्वे केला व उर्वरित लाभार्थ्यांना या योजने मधून वंचित राहावे लागले. तरी उर्वरित लाभार्थ्यांचा सर्वे करून त्यांची नावे प्रपत्र ड मध्ये पात्र लाभार्थी म्हणून समाविष्ट करण्यात यावी
अतिक्रमण धारकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्या
Bhagirath Raja 24 News.com
0




टिप्पणी पोस्ट करा