अखेर जवळा गावकरी बसले उपोषणाला

*अखेर जवळा गावकरी बसले उपोषणाला*
*उपोषणाचा इशारा देऊनही तहसिलदाराची कारवाई नाही* *गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा* जवळा:- तालुक्यातील सर्वात मोठे असलेले जवळा गाव व तितकेच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून जवळा येथील ग्रामस्थांना घराकुलापासून वंचित राहावे लागत आहे. शासन निर्णयानुसार 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे हे धोरण राबविण्यात येत आहे मात्र जवळा येथील ग्रामस्थांना त्यांच्या जागेच्या, आठ अ ,वर ग्रा. प. ची मालकी दाखवत असल्यामुळे लाभार्थ्यांना घराकुलाचा लाभ मिळत नाही आहे व तसेच चुकीच्या सर्वे मुळे अनेक लाभार्थ्यांच्या जागेवर पक्के घर नसूनही पक्के घर लिहिले आहे व आज जवळा गावात येथे कोणाकडेही टेलिफोन नसून सुध्दा 112 लाभार्थ्यांच्या घरी टेलिफोन असल्याने त्यांना लाभापासून वंचित केले आहे. याकरिता जवळा येथील माजी उपसरपंच भारत काळबांडे व अमोल टोपरे यासह अनेक गावकरी नागरिक व महिला 2 तारखेला आर्णी येथील तहसील कार्यालय समोर उपोषणास बसले आहे.
जवळा येथील ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे आर्णी येथील तहसील कार्यालयात अतिक्रमण धारकांना नियमनुकुल करण्या संदर्भात मागणी केली होती व ही मागणी मान्य न झाल्यास 2 जानेवारी पासून उपोषण करणार असल्याचा इशारा सुध्दा दिला होता तरी सुध्दा शासन स्थरावर याचा विचार न करता ऐकही मागणी मान्य न केली त्यामुळे उपोषण कर्त्यासह जवळा येथील शेकडो महिला व पुरुष उपोषणास बसले आहे.
*या मागण्या पूर्ण झाल्या तरच उपोषण सोडविणार* प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच जवळा येथील शासकीय जमिनीवर 45 ते 50 वर्षापासून अतिक्रमण करून राहत असलेल्या एकूण 536 कुटुंबांना कायमस्वरूपी करून वाढीव गावठाण मध्ये समाविष्ट करण्यात यावे अतिक्रमित 536 कुटुंबापैकी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प पत्र ब मधील 118 कुटुंब वंचित राहिलेले आहे त्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अतिक्रमित 536 कुटुंबापैकी 223 कुटुंबाची प पत्र ड मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निवड झालेली आहे त्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा सन 2018 मध्ये प पत्र ड करिता एकूण 868 कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळण्याकरिता पंचायत समिती आर्णी येथे जवळा ग्रामपंचायतीने यादी सादर केली असता यापैकी 467 कुटुंबाचा सर्वे करून पात्र लाभार्थी म्हणून घोषित करण्यात आली आहे तरी उर्वरित 401 कुटुंबाचा पुन्हा सर्वे करून प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र लाभार्थी म्हणून घोषित करण्यात यावी प पत्र ड मध्ये 467 पात्र लाभार्थी म्हणून निवड झाली त्यापैकी चुकीच्या सर्वेमुळे 159 लाभार्थी अपात्र करण्यात आले त्यांना सुद्धा पात्र लाभार्थी म्हणून घोषित करण्यात यावे , अल्पसंख्याक (मुस्लिम) सिस्टिमच्या चुकीमुळे पात्र असताना सुद्धा अपात्र करण्यात आले त्यांचा प्रपत्र -ड च्या यादी करिता पुन्हा सर्वे करून पात्र लाभार्थी म्हणून घोषित करण्यात यावे, घरकुलाची अनुदान दोन टप्यामध्ये देण्यात द्यावे अशा मागण्या घेऊन ग्रामस्थ उपोषणास बसले आहे ह्या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे मत उपोषण करते भारत काळबांडे, अमोल टोपरे आणि ग्रामस्थ यांनी व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...