अखेर या उपोषणाची प्रशासनाच्या आश्वासनानंतर सांगता

*अखेर या उपोषणाची प्रशासनाच्या आश्वासनानंतर सांगता*. *तहसीलदार भोसले यांची महत्त्वाची भूमिका*. *घंटे का काम मिंटो मे* तहसीलदार परसराम भोसले.
जवळा येथील ग्रामस्थांनी 2 तारखेपासून आपल्या हक्काचे घरे मिळण्याकरिता माजी उपसरपंच भारत काळबांडे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू केले होते या उपोषणात जवळा येथील माजी उपसरपंच भारत काळबांडे व सामाजिक कार्यकर्ते अमोल टोपरे हे बसलेले होते उपोशनाच्या तिसऱ्या दिवशी तहसीलदार परसराम भोसले यांनी लेखी आश्वासन दिल्या नंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. सर्वांसाठी घरे या शासनाच्या योजनेत जवळा येथील ग्रामस्थ अतिक्रमित जागेमुळे वंचित राहिले होते यासाठी जवळा येथील माजी उपसरपंच भारत काळबांडे व अमोल टोपरे यांनी 2 तारखेपासून तहसील कार्यालय आर्णी समोर उपोषण सुरू केले होते या उपोषणात दोन्ही उपोषणकरत्यांच्या प्रकृती खालावली गेली होती आज तिसऱ्या दिवशी आर्णी येथील तहसीलदार भोसले यांनी उपोषण मंडपात भेट दिली व उपोषणकर्ते यांचे म्हणणे जाणून घेतले व तत्काळ, घंटे का काम मिंटो मे, असे म्हणून आदेश पारित करायला आर्णी तहसील मधील कर्मचाऱ्यांना सांगितले .आर्णी तहसील कार्यालय लेवलवरिल अडचणी सोडविण्याचे आदेश देवून भूमी अभिलेख कार्यालयाला अतिक्रमित जागेवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मोजणी करून शासन निर्णयानुसार प्रत्येकी पाचशे स्क्वेअर फुट जागा मोजणी करून द्यावी असे आदेश लेखी स्वरूपात दिले व तसेच कोणी यापेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण केले असेल तर शासन निर्णयानुसार त्याची मोजणी करून शासन दंड भरून त्यांच्या नावावर करून दिली जाईल जर ते गावठाणात असेल तर इतर सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यास कारवाई करा असे आदेश दिले.
*गटविकास अधिकारी गैरहजर* उपोषणाची सांगता करण्या करीत आर्णी तहसील कार्यालयाचे तहसीलदार आले असता आर्णी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे या मात्र गैरहजर होत्या सर्व उपोषणकरत्यांचे सर्व प्रश्न हे पंचायत समितीशी निघडीत असल्याने तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी विस्तार अधिकाऱ्यांनी सुट्टीवर आहे असे उत्तर दिले त्यामुळे तहसीलदार भोसले यांनी उपोषणाची सांगता केली. *तर पंचायत समितीचे कामकाजही तहसील ला द्या*. जर गटविकास अधिकारी हजर राहत नसेल व त्यांचे काम सुध्दा तहसील लेवलवर सोडवावे लागत असेल तर पंच्यायात समितीचे कामकाजही तहसील कार्यालयालाच द्या असे मत तहसीलदार भोसले यांनी व्यक्त केले यावेळी राष्ट्रवादीचे माजी विधानपरिषद सदस्य ख्वाजा बेग व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, हरीश कुडे उपस्थित होते.
*तहसीलदार भोसले यांचे आभार* आमच्या उपोषणाची दखल घेत आर्णी येथील तहसीलदार भोसले यांनी तिसऱ्या दिवशी उपोषण स्थळाला भेट दिली व ,घंटे का काम मिंटो मे, असे म्हणून ताबडतोब अतिक्रमण धारकांना 1 महिन्याच्या आत मोजणी करून अतिक्रमण धारकांना नियमानुकुल करून घेण्याचे लेखी आदेश दिले त्याबद्दल आर्णी तहसीलदार परसराम भोसले यांचे आभार मानून उपोषणाची सांगता केली. भारत काळबांडे माजी उपसरपंच जवळा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...