जि. प.प्राथमिक मराठी शाळेतर्फे ग्राम स्वच्छता अभियान

जि. प.प्राथमिक मराठी शाळेतर्फे ग्राम स्वच्छता अभियान # शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग # राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजन
जवळा:-आर्णी तालुक्यातील ग्रामपंचायत देवगाव येथे दिनांक ११ जानेवारी रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळा,पुंडलिक महाराज संस्थान मूर्तिजापूर अकोला यांच्या पालखी चे आगमन व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त भव्य विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन राहुल लाभसेटवार शिवसेना उप तालुका प्रमुख आर्णी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
त्याचे औचित्य साधून ग्रामपंचायत देवगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेने ग्रामसफाई करून स्वछतेचा संदेश देत गावकर्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभात फेरी काढली.गावातील रस्ते झाडून कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली,यावेळी मुख्याध्यापक कैलास कदम,जयस्वाल सर,गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका प्रचारक शाम खडके,श्रावण खडके,शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.
कोट..... शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता आणि अन्नाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन , मानवी मल-मूत्राची विल्हेवाट यासारख्या,विषयासाठी काम करून,ग्रामविकासाचा पाया मजबूत केला जाऊ शकतो. कैलास कदम,मुख्याध्यापक जि.प.शाळा.देवगाव

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...