आर्णी येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा
जवळा: प्रतिनिधी
आज दिनांक 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर , पत्रकारितेचे जनक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आर्णी पोलीस स्टेशन येथे मौलाना अबुल कलाम आझाद ह्या ग्रंथालयामध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य पुरस्कार प्राप्त प्रल्हाद इंगळे काका तर प्रमुख वक्ते म्हणून एपीआय गणपतराव काळुसे तर आणि आर्णी पत्रकार संघाचे आबिद फानन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात एपीआय काळुसे यांनी पत्रकारितेचे महत्त्व काय आहे. हे आपल्या भाषणातून व्यक्त केले.
ना बंदूक की गोली से ना तलवार की धार से बंदा डरता है तो लेखनी की धार से नाही हे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साप्ताहिक परिपूर्तीचे संपादक जे. डी. यांनी केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रल्हाद काका इंगळे उर्फ साने गुरुजी यांना मान मिळाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून एपीआय काळुसे सर पत्रकार संघाकडून प्रमुख पाहुणे म्हणून अबिद भाई फानन हे होते.
या कार्यक्रमात आर्णी येथील सर्पमित्राचा स्वागत करण्यात आले.
तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दैनिक लोकदूत चे किशोर पवार यांनी केले या कार्यक्रमाचे नियोजन वीरेंद्र पाईकराव व रुपेश भाऊ टाक यांनी केले या कार्यक्रमात दैनिक देशोन्नतीचे राजूभाऊ इंगोले तसेच लोकमतचे राजूभाऊ कुशवाह,सय्यद अक्रम, पुण्यनगरी चे पत्रकार गणेश एकंडवार, राजूभाऊ राठोड , शांताबाई राठोड तसेच इतर पत्रकार बंधू उपस्थित होते अशा प्रकारे मोठ्या उत्साहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
आर्णी येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा