नागपंचमीच्या निमित्ताने पोफाळी परिसरात भरणार जुगाराचा महाबाजार

नागपंचमीच्या निमित्ताने पोफाळी परिसरात भरणार जुगाराचा महाबाजार
कुठे गुपित तर कुठे उघड होणार हजारो रुपयांची उधळण. पोफाळी :- भागवत काळे. उमरखेड तालुक्यातील पोफाळी परीसरातील बहुतांश गावामध्ये नागपंचमीच्या निमित्ताने जुगार खेळण्याची आणि यावर हजारो रुपये उधळण करण्याची अविरत परंपरा आजही कायम चालू असल्याचे दिसून येते आहे.
प्रत्येक सणाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम तथा उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे जसे होली निमित्त रंगाची उधळण करणे, दसऱ्याला सोनं वाटनें, दीपावली निमित्त दीपोत्सव तथा फटाक्यांची आतिषबाजी करणे, गुढीपाडव्याला गुढी उभारली जाते. प्रत्येक सण वेगवेगळ्या प्रकारांनी साजरे केले जातात. त्याचप्रमाणे असाच एक सण म्हणजे नागपंचमी या नागपंचमी निमित्त पोफाळी परिसरातील बहुतांश गावामध्ये जुगार खेळण्याची अनोखी प्रथा किंवा परंपरा चालू असून याची व्याप्ती कमी होण्याऐवजी वाढतच चालली आली आहे. यामुळे लहान वयाच्या मुलांपासून या जुगाराची सवय पडत चालली आहे.
काहीजण हा सण म्हणून खेळतात तर काहीजण जुगाराच्या अधीन होऊन हजारो रुपये उधळून टाकतात. आणि यांमुळे त्यांना जुगार खेळण्याची वाईट सवय कायमस्वरूपी लागून जाते. हा प्रकार पोफाळी परिसरातील अनेक गावांमध्ये पाहावयास मिळतो. दरवर्षी जुगार खेळण्याच्या प्रमाणात अधिकच वाढ होताना दिसत आहे. दरवर्षी हा नागपंचमीचा सण येतो, मात्र जुगार खेळण्याच्या सवयीमुळे सण आनंदाने साजरा करण्या ऐवजी अनेक घर उध्वस्त होतात. ही अशी प्रथा कुठेतरी थांबायला हवी, यावर आवर घालायला हवा. यासाठी योग्य ती पावले उचलली पाहिजे अशी चर्चा जनसामान्यात होतं आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...