बौध्द धम्मच मानव जन्माचे कल्याण करणारा (प्राचार्य मोहनराव मोरे यांचे प्रतिपादन)

बौध्द धम्मच मानव जन्माचे कल्याण करणारा (प्राचार्य मोहनराव मोरे यांचे प्रतिपादन)
महागाव:- निलेश पाटील मानवी जन्मात अनेक सुख दुःख , अडी अडचणी असुन यावर एकच उपाय असुन तो म्हणजे भगवान गौतम बुध्दांनी सांगितलेला धम्म हाच असुन धम्माच्या मार्ग मानवी जीवनाचे कल्याण करणारा असल्याचे प्रतिपादन प्रा मोहनराव मोरे यांनी केले आहे
महागाव येथील श्रावस्ती बौद्ध विहारामध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा महागाव तालुका शाखेच्या वतीने दि.६ऑगस्ट रोजी एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मोरे बोलत होते पुढे बोलतांना ते म्हणाले की, मानवी जीवन म्हणजे अडीअडचणी,संकटे, दुःखाने भरलेला खडतर प्रवास असुन याचा सामना करता करताच मानवाचे आयुष्य झिजुन जात आहे परंतु यामध्ये तरून मानवी जीवन सुखमय,शांततामय जगण्यासाठी महान कारूनिक तथागत भगवान गौतम बुध्दांनी सांगितलेल्या शिकवणी नुसार जीवन व्यतीत करणे गरजेचे असुन बौद्ध धम्मामध्येच मानवी जीवनाचे कल्याण करण्याचे सामर्थ्य असल्याचे मोरे म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश खंदारे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक रवी भगत होते तर विषय मार्गदर्शक तालुका कोषाध्यक्ष किशोर आळणे केंद्रीय शिक्षक व भास्कर कांबळे केंद्रीय शिक्षक उमरखेड यांनी या शिबिराला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष प्रकाश खंडारे ,संस्कार उपाध्यक्ष देविदास भगत ,संरक्षण विभाग उपाध्यक्ष श्याम कांबळे , सरचिटणीस संस्कार सचिव राहुल नरवाडे , अनिल वाठोरे, हनवता खंदारे ,महिला उपाध्यक्ष नीता रणवीर ,संरक्षण महिला सचिव छायाताई खंदारे व इतर तालुका कार्यकारणीतील व ग्रामीण शाखेच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचलन भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस अनिरुद्ध मुरादे यांनी केले आभार प्रदर्शन राहुल नरवाडे यांनी केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...