दुःखद बातमी ...
*राजू उत्तमराव पाटील यांचे दुःखद निधन*
राजू उत्तमराव पाटील यांचे आज दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता हृदय घाताने दुःखद निधन झाले, मृत्यू समय त्यांचे वय 53 आहे, आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सलग दुसऱ्यांदा सभापती म्हणून विराजमान आहेत, तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष उत्तमराव पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत तर यवतमाळ चे माजी खासदार स्वर्गीय उत्तमराव देवराव पाटील यांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत, त्यांच्या मागे 1 मुलगा व 2 मुलगी, पत्नी, आई, असा आप्त परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता लोणी ता. आर्णी जि. यवतमाळ येथे होणार आहे, पाटील परिवारावर कोसळलेल्या दुःखा तून सावरण्याची शक्ती देवो व स्व राजू पाटील यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...
*भावपूर्ण श्रद्धांजली*
राजू उत्तमराव पाटील यांचे दुःखद निधन
Bhagirath Raja 24 News.com
0

टिप्पणी पोस्ट करा