*युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची आर्णी तालुका कार्यकारणी गठित*
*तालुका अध्यक्ष पदी रुपेश टाक तर उपाध्यक्ष गणेश धनोडे आणि वीरेंद्र पाईकराव तर सचिव अक्रम सय्यद यांची नियुक्ती*
गणेश एकंडवार आर्णी
आर्णी येथील स्थानिक विश्राम गृह येथे 8 तारखेला 11 वाजता युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय आर सूर्यवंशी, यवतमाळ शहर उपाध्यक्ष आत्माराम मडावी, अभिजीत मडावी, यवतमाळ जिल्हा संघटक लक्ष्मण टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच आर्णी येथील ज्येष्ठ पत्रकार राजेश महेश्वरी, जावळकर सर, आबिद फानन यांची ही प्रमुख उपस्थिती होती.
युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अधक्ष विजय सूर्यवंशी यांनी संघटनेविषयी सर्वांना मार्गदर्शन केले तर युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी पत्रकारांवर होत असलेले हल्ले,खोटे गुन्हे दाखल होतात त्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ त्यांच्या मागे नाही तर समोर असेल व त्यासाठीच ही युवा ग्रामीण पत्रकार संघटना आहे असे सांगितले व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जिल्हा अधाक्ष तसेच जिल्हा संघटक यांच्या हस्ते नियुक्ती पात्र देऊन आर्णी तालुका अध्यक्षपदी रुपेश टाक यांची नियुक्ती तर उपाध्यक्षपदी गणेश धनोडे आणि वीरेंद्र पाईकराव तर सचिव पदी सय्यद अक्रम,सहसचिव पदी प्रसाद जाधव,प्रसिद्धी प्रमुख रशीद मलनस यांची नियुक्ती करण्यात आली.तर युवा तालुका अध्यक्षपदी गौरव बाबर,उपाध्यक्षपदी गणेश राऊत,सचिव पदी विकास शिंदे,सहसचिव पदी उमेश रावते,तसेच बोरगाव सर्कल प्रमुख रमेश हंसराज राठोड, सावली सर्कल प्रमुख रमेश काशीराम राठोड,जवळा सर्कल प्रमुख अमोल ठक, लोनबेहळ सर्कल प्रमुख राजू राठोड,सदस्य शनी आरेकर ,गणेश एकंडवार, जफर खान ,कारण शेलकर यांची नियुक्ती करण्यात आली सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर आर्णी तालुक्यात शुभेच्छानचा वर्षाव होत आहे.
युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची आर्णी तालुका कार्यकारणी गठित
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा