जवळा ग्रामपंचायत येथे मोफत मानसिक आजार निदान व उपचार शिबीर
सध्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते शारीरिक आरोग्याची तपासणी दवाखान्यात सहज उपलब्ध होते. पण मानसिक आरोग्याला जपणे हे सुद्धा महत्वाचे असते परंतु अनेकांना या मानसिक आजारा संदर्भात वाच्यता करणे योग्य वाटत नाही त्यामुळे या महत्वाच्या आरोग्याच्या समस्ये वर दुर्लक्ष होते. त्याचे परिणाम शारीरिक व कौटुंबिक व सामाजिक जीवनावर देखील होतात त्यामुळे मानसिक आजारांवर दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून निदान केल्यास यावर उपचार श्यक्य आहेत आज सर्वत्र भेडसावणाऱ्या मानसिक आजारात १) निद्रानाश२) उदासीनता ३) ओब्सेसिव्ह / कम्पलसिव्ह डिसऑर्डर४) पॅनिक डिसऑर्डर ५) हिस्टरिया ६) स्किझोफ्रेनिया७) स्मृतिभंश
८) लैंगिक आजार९) व्यसनाधीनता आशा मानसिक आजाराची वेळेचं तपासणी व उपचार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात मानसिक आजारा विषयी जागृती होऊन नागरिकांना मोफत तपासणी उपचार व योग्य सल्ला मिळावा या उद्देशाने मानसिक विशेष तज्ञ डॉक्टर विनोद जाधव एमबीबीएस एमडी यवतमाळ, मानसिक आरोग्य तपासणी निदान व उपचार जवळा येथील ग्राम पंचायत सदस्यांच्या माध्यमातून २१ जानेवारी २०२४ रोज रविवार सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत तपासणी व उपचार शिबीर आयोजित केले असून डॉ.विनोद जाधव सुप्रसिद्ध मानसिक आरोग्य तज्ञ यवतमाळ हे उपस्थित राहून सेवा देणार आहेत याशिबिराचा लाभ घेण्यासाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालय कडेही नोंदणी करता येणार असून शिबिरात पुर्णतः तपासणी, मार्गदर्शन, समुपदेन, औषधे मोफत असणार आहे या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.
विशेष सहकार्य केअर पॅथॉलॉजी लॅब भुयार हॉस्पिटल समोर माइंदे चौक यवतमाळ सर्व रक्ताच्या चाचण्या मोफत केल्या जाईल. या शिबिराचा जवळा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जवळा येथील सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी केले
जवळा ग्रामपंचायत येथे मोफत मानसिक आजार निदान व उपचार शिबीर
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा