विहिरीत उडी घेऊन दाम्पत्याची आत्महत्या
डेहणी शिवारातील घटना; परिसरात हळहळ
• आर्णी (ता.प्र).
आर्णी पोलिस स्टेशन हद्दीतील डेहनी शेतशिवारात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार (दि. 14) सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
किशोर बाळकृष्ण नाटकर (45) व पत्नी वनिता किशोर नाटकर (40) असे मृत दाम्पत्याची नावे आहेत. मृतक दाम्पत्य हे सकाळी 7 वाजताच्या सुमारास शेतात पराटी काढण्यासाठी घरून निघाले. शेताच्या वाटेतच वामन दिघ्घलवार यांचे शेत असून त्यांचे विहीरीवरुनच डेहणी गावाला पाणीपुरवठा होता. याच विहिरीत दोघांनीही उडी घेऊन आत्महत्या केली. ग्रा प कर्मचारी श्रीकांत नाटकर हे सकाळी 10 वाजताच्या सुमारास विहिरीकडे गेले. तेव्हा दोन मृतदेह विहिरीत तरंगत असल्याचे दिसले. माहिती मिळताच आर्णी पोलिसांनी दोन्ही मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून पंचनामा केला. तेव्हा दोन्ही मृतदेह नाटकर दाम्पत्याचे असल्याचे निदर्शनास आले. किशोर नाटकर यांच्यावर विविध बँकांचे कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे असा कयास बांधला जात आहे. घटनेचा पुढील तपास आर्णी पोलिस करीत आहे.
विहिरीत उडी घेऊन दाम्पत्याची आत्महत्या
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा