अवैध रेती उत्खनाने घेतला तिघांचा बळी; परिसरात काही काळ तणाव

अवैध रेती उत्खनाने घेतला तिघांचा बळी; परिसरात काही काळ तणाव
कवठाबाजार घटनेप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल
• आर्णी (ता.प्र). तालुक्यातील कवठाबाजार येथील पैनगंगा नदीत बुडून शनिवारी काकुसह दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाला होता. नदीपात्रात रेतीचा अवैध उपसा केल्याने ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी मृत्यूप्रकरणी दोषींवर रविवारी (दि. 14) गुन्हा दाखल केला आहे.
प्रतीक्षा प्रवीण चौधरी (वय अंदाजे 35) अक्षरा नीलेश चौधरी (12) आराध्य नीलेश चौधरी (11) अशी मृत काकूसह दोन चिमुकल्यांची नावे आहेत. शनिवारी सांयकाळी 5 वाजताच्या सुमारास कवठा बाजार येथील चौधरी कुटुंबातील तीन मुली व दोन जावा देवघरातील निर्माल्य विसर्जनासाठी गावा शेजारीच असलेल्या पैनगंगा नदीपात्रावर गेल्या. यावेळी धुणे धुण्याच्या गोट्यावर निर्माल्य विसर्जन करीत असताना आराध्याचा पाय घसरल्याने ती नदिपात्रात पडली. तिला वाचविण्यासाठी अक्षरा व तिची काकू प्रतीक्षा यांनी पाण्यात उडी मारली. त्याही पाण्यात बुडत असल्याचे पाहुन जाऊ जया व रेणू यांनी देखील पाण्यात उडी मारली. परंतु त्या खोलपाण्यातून सुखरुप बाहेर पडल्या. मात्र आरध्या अक्षरा व काकू प्रतीक्षा या खोल पाण्यात बुडाल्या. यावेळी जया व रेणू यांनी आरडाओरडा करत गावातील नागरिकांना हाक दिली. परंतु तोपर्यंत तिघींचाही बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान याप्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृताचा पंचनामा करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे रात्रभर तिन्ही मृतदेह नदी पात्रा जवळच होते. दरम्यान महसूल व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजुत काढली व गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले. तसेच रविवारी प्रशासनाच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यांने संबंधित त्यांचावर 304 व 34 नुसार आर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्याने तिन्ही मृतदेहाचे शवविच्छादन करण्यात आले. घटनेचा अधिक तपास पोलिस अधीक्षक व दारव्हा येथील पोलिस उपविभागिय अधिकारी रजनिंकात चुलुमुला, पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...