*राष्ट्रीय शिखर पुरस्कार 2024 ने विजयकुमार ठेंगेकर सन्मानीत*
गोवा येथे सन्मान सोहळा संपन्न
------------------------------------------------------------
यवतमाळ येथील समाज कार्यकर्ते तथा आर्णी पंचायत समितीला कार्यरत ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांना त्यांच्या 25 वर्षातील सामाजिक कार्यातील योगदानासाठी ज्ञानरचना सोशल फाउंडेशन, कल्याण-ठाणे यांच्याकडून दिला जाणारा राष्ट्रीय शिखर पुरस्कार 2024 (इंडियन पिनॅकल नॅशनल अवॉर्ड 2024) गोवा विधानसभा अध्यक्ष तथा माजी कृषी पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा आदिवासी कल्याण क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री गोवा सरकार यांच्या शुभहस्ते पद्मश्री उमाशंकर पांडे (बुंदेलखंड), मराठी सिने अभिनेत्री आशु सुरपूर , गोमंतक सकाळ न्यूज एडिटर सचिन कोरडे सर, ज्ञानरचनाचे संचालक प्रविण साळवे यांच्या उपस्थितीत पणजीम कन्व्हेन्शन सेंटर,माळा, क्लिंगुट बीच जवळ, गोवा येथे पार पडलेल्या खास कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
नारी समता मंच पुणे, गोदावरी फाउंडेशन, जळगाव, प्राथमिक शिक्षण समृद्धी नगर परिषद यवतमाळ - पुसद, चैत्राली फाउंडेशन ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, यवतमाळ, लोकसेवा मंडळ नरवेल तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा, सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ, ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, यवतमाळ, यवतमाळ नगर परिषद शहर विभाग, यवतमाळ, युवा वेध मंच, यवतमाळ, प्रभात रुरल डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन सोसायटी यवतमाळ या संस्थांच्या माध्यमातून गेल्या विस वर्षांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याचे सर्वेक्षण व संशोधन कार्य, माता प्रजनन व बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत किशोरी विकास कार्यक्रम, सूक्ष्म नियोजन कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरण, जीवन शाळा, प्रशिक्षक म्हणून भरीव कार्य, बाल संस्कार, युवा मार्गदर्शन, स्वयंरोजगार मार्गदर्शन, एड्स व लैंगिक शिक्षण मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम व बचत गट कार्यक्रम. यवतमाळ जिल्ह्यातील 100% कोलाम समाज बांधवांच्या वस्ती व पोडांवर आदिवासी विकासात्मक कार्य. जल संधारण व पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम ग्रामीण व नागरी स्वच्छता अभियान कार्यक्रमांतर्गत केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छता कार्यक्रमात प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहले आहे तर पल्स पोलिओ विशेष मोहिमेमध्ये सहभाग असे भरीव कार्य त्यांचे आहे.
तर "सुविचार:संस्कार कलश" या व्हाट्सएप ग्रुपचे ते ऍडमिन असून ते प्रशासकीय सेवेत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असतांना या सेवेच्या माध्यमातून व ग्रुपच्या माध्यमातून ते विवाह पूर्व समुपदेशन, शालेय मुलांसाठी दिवस तुझे हे फुलायचे व परीक्षेला जातांना, तरुणांसाठी तू नव्या जगाची आशा, महिला वर्गांसाठी घे भरारी - हो स्वयंसिद्धा, शेतकरी वर्गासाठी हरणार नाही ; तर लढणार..., या सारख्या कार्यक्रमासोबतच पाणी वाचवा ; जीवन वाचवा, पर्यावरण आणि वृक्ष लागवड, ग्रामसभा लोकाभिमुख करणे, गुणवंत विद्यार्थी सन्मान, ग्राम स्वच्छता अभियान, वृद्धाश्रमांना, अनाथाश्रमांना, आजारी व्यक्तींना एक हात मदतीचा, कोरोना महामारीमध्ये गरजूंना अन्न-धान्य किटचे, औषध-पाण्याचे वाटप, मार्गदर्शन असे भरीव उपक्रम ते गेल्या पंचवीस वर्षांपासून राबवित आहेत आणि याच कार्याची दखल घेऊन त्यांच्या 25 वर्षातील समाज कार्यातील योगदानाबद्दल त्यांना हा शिखर सन्मान प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय शिखर पुरस्कार 2024 ने विजयकुमार ठेंगेकर सन्मानीत*
Bhagirath Raja 24 News.com
0




टिप्पणी पोस्ट करा