भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यवतमाळ उपाध्यक्षपदी सुरेश आव्हाड यांची निवड.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यवतमाळ उपाध्यक्षपदी सुरेश आव्हाड यांची निवड.
यवतमाळ. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यवतमाळ उपाध्यक्षपदी सुरेश आव्हाह यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले आहे की उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडताना भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवून देण्यासाठी पक्षाच्या ध्येय धोरणाचा विचार, पार्टीचे काम तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम नक्कीच यशस्वीपणे कराल.
या वेळी गेल्या काही वर्षात विविध भव्य समाज उपयोगी कार्यक्रम व जनहिताचे उपक्रम प्रचंड जनसंपर्क यातून समाजात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवलेल्या या युवा नेतृत्वाचा पक्षाने राज्यस्तरीय सन्मान केल्याने समाजाच्या सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट असून ऍड.आदित्य माने,लल्ला भाऊ दिंडे, पवन राठोड, संतोष पवार, सरपंच गणेश भवानकर, संतोष पडोळकर,बबलू डाखोरे, अमर अंभोरे,राहुल जयस्वाल, योगेश तळनकर हे उपस्थित होते. पक्षाने दिलेली सर्व जवाबदारी पार पाडेल अशी ग्वाही सुरेश आव्हाड यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...