*वादळाच्या तडाख्यात झाडें पडली, विज खांब कोसळले*
*आर्णी तालुक्यातील पाभळ येथील 25 घराची टीन पत्रे वादळाच्या तडाख्याने उडाली, तर तीन जण जखमी झाले*
शहर प्रतिनिधी
आर्णी :- तालुक्यातील काही भागात रविवारी 3 वाजता च्या सुमारास घोगावत आलेल्या वादळाने पाभळ,देऊरवाडी बु भागात हाहाकार उडवला.अनेक ठिकाणी मोठमोठी झाडें उन्मुळून पडली.तर काही ठिकाणी विद्युत खांब कोसळले आहे.विज तारा तुटल्या आहे. पाभळ येथील 25 घरावरची टीन पत्रे उडाली असून यामध्ये हिराशिंग झिंगराजी पाटील (75) , लक्ष्मण गणपत राठोड ( 60) अनिता भारत जाधव (55) तिघे रा.पाभळ येथील असून या चक्रीवादळात जखमी झाले आहे. या जखमीच्या हाताला ,पाय ला दुखापत होऊन जखमी झाले आहे .
वादळाच्या तडाख्यात आर्णी तालुक्यातील पाबळसह संपूर्ण तालुक्यात अतोनात नुकसान
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा