अंध शंकुतला बाई चवडे हीचे उमरीपठार वृध्दाश्रमात निधन—
अंधारलेल्या जगातील एक जीव निघुन गेला.
*******************
तळणी येथील अंध असलेली शंकुतलाबाई चवडे ही वृध्द महीला १५वर्षापासुन ऊमरी पठार येथील संत ढोला महाराज वृध्दाश्रमात रहायला आली होती.तिला घरदार अथवा नातेवाईक नव्हते.निराक्षीत झालेली आणि डोळ्याने दिसत नसल्याने असाह्य झालेली ही वृध्द बाई संस्थापक शेषराव डोंगरे यांचे नावाने शोध घेत वृध्दाश्रमात दाखल झाली.या वृध्दाश्रमात तिने पंधरा वर्ष काढली.तिच्या डोळ्यासमोर अंधत्वाने अंधार पसरलेला होता.या अंधारात तिची काठी धरुन वृध्दाश्रमाने तिची सेवा करुन तिला हिंमत दिली. तिच्या अंधारलेल्या आयूष्याला कुरवाळले.पंधरा वर्षाच्या कालावधी नंतर वृध्दापकाळाने तिचे निधन झाले.तिच्या निधनाने वृध्दाश्रमात शोकछाया पसरली.तिचा अंत्यविधी सन्मानाने संस्थापक शेषरावजी डोंगरे,कार्यवाह जयप्रकाश डोंगरे तसेच वृध्दांचे ऊपस्थितीत पार पडला.
अंध शंकुतला बाई चवडे हीचे उमरीपठार वृध्दाश्रमात निधन
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा